आभार संस्था महिला शाखा, रत्नागिरी च्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त स्नेहल पावरी व विधिज्ञ अनघा लाकडे यांचा सन्मान

0

रत्नागिरी : आभार संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम म्हणजेच जागर स्त्री शक्तीचा…! आभार संस्था संचलित, रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी महिला शाखा आयोजित जागर स्त्री शक्तीचा व तिळगूळ समारंभ हा कार्यक्रम रविवार दि १६ जानेवारी रोजी सायंकाळी ३ वा. व्यंकटेश हाँल मारुती मंदिर रत्नागिरी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा समाजसेविका तनया शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला मंडळ अध्यक्षा ऐश्वर्या किर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नलावडे (काकी), शुभदा आगाशे, प्रेरणा विलणकर, गोळपकर मॅडम, राखी भोळे, प्रिया राणे, नार्वेकर मँडम, सौ शितल सकपाळ मँडम आणि भजन मंडळाचे अध्यक्ष साईनाथजी नागवेकर व प्रविण सावंतदेसाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमात खारवी समाजातील राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त रत्नागिरीतील स्नेहल संतोष पावरी व कासारवेलीतील विधिज्ञ अनघा अभय लाकडे यांना व्यंकटेश हाँल, मारुती मंदिर रत्नागिरी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 17-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here