शिवसेना सागवे भागातील उपविभागप्रमुखांच्या नियुक्त्या

0

राजापूर : शिवसेनेच्या सागवे विभागांतर्गत उपविभागप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहिती तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी दिली. गेले काही दिवस रिफायनरी प्रकल्पावरुन सागवे विभाग शिवसेनेतील संघर्ष चव्हाट्यावर आला असुन शिवसेनेच्या वरीष्ठ पातळीवरुन सेनेची त्या विभागाची संपूर्ण कार्यकारीणीच बरखास्त करण्यात आली होती काही दिवसांपुर्वी माजी सभापती कमलाकर कदम यांची सागवेच्या विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली होती त्यानंतर आता सेनेकडून काही उपविभाग प्रमुखांच्या नियक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अणसुरे परिसरासाठी राजन कोंडेकर, सागवे, कात्रादेवी परिसरासाठी नारायण गावकर तर अनिल नाणारकर यांची नाणार परिसरासाठी उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावरुन या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लवकरच या विभागातील सर्व शाखाप्रमुखांच्याही नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here