त्रिमुखी देवीची आज प्राणप्रतिष्ठापना

0

रत्नागिरी : श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान पाली, रत्नागिरी येथील श्री त्रिमुखी देवीच्या मंदिराचा जीर्णोध्दार पूर्ण झाला असून, त्यामध्ये श्री त्रिमुखी देवी व अन्य देवता यांच्या पुनःप्राणप्रतिष्ठापनेचा धार्मिक विधी दि.२९ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. दि.२९ रोजी प्रायश्चित, पुण्य हवाचन, मातृका पुजन, शांती, होम, स्नानविधी, मुख्य देवता स्थापना, गृह स्थापना इत्यादी धार्मिक विधी पार पडणार आहेत. सायंकाळी मूर्ती प्रदक्षिणा करून मंदिरात ठेवण्याचा कार्यक्रम होणार आहे.दि.१ मार्च रोजी स.८ वा, वास्तुपुरूष स्थापना, मुख्य देवता, तत्वन्यास, स्थानप्रतिष्ठा, मूर्तीची षोडशोपचार पूजा, हवन, बलिदान, पुर्णाहुती, अभिषेक आरती, प्रार्थना. दु.१.३० वा.महाप्रसाद होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here