बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावरून सौरव गांगुलीची होणार सुट्टी?

0

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविले जाऊ शकते.

याशिवाय, बोर्डाचे सचिव जय शाह यांचाही 3 वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर-2022 मध्ये संपणार आहे. अशा स्थितीत या दोघांच्या जागी बोर्डाचा नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जाणार, की गांगुली आणि शाह यांच्याकडेच पुन्हा एकदा जबाबदारी येणार, हे पहावे लागेल. ऑक्टोबर-2019 मध्ये गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

सौरव गांगुली 2015 पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनशी जोडला गेला होता. यानंतर 2019 मध्ये त्याला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआय चे अध्यक्ष बनवण्यात आले होते. स्पोर्ट्स तकच्या एका वृत्तानुसार, त्याचा कार्यकाळ या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे. यामुळे त्याला निरोप देऊन मंडळाला नवा अध्यक्षही मिळू शकतो. त्यांच्या अध्यक्ष पदाच्या काळात भारताने द्विपक्षीय मालिकांमध्ये यश मिळविले आहे.

गांगुलीचे आणखी एक मोठे यश म्हणजे, त्याने द्रवीडला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेण्यास राजी केले. राहुल द्रविडला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख म्हणून बेंगळुरूमध्ये काम करत होता. याशिवाय गांगुलीने माजी दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मणलाही एनसीएमध्ये सामील होण्यासाठी राजी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 18-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here