डी. जे. सामंत महाविद्यालयात युवा दिन साजरा

0

रत्नागिरी : तालुक्यातील पाली येथील डी. जे. सामंत महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ, आजीवन अध्ययन विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यातर्फे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली. युवा दिन कार्यक्रम ऑनलाईन झाला. यानिमित्त वक्तृत्व व पोस्टर स्पर्धा घेतल्या.

महाविद्यालयाच्या DLLE विभागाचे प्रमुख प्रा. सुभाष घडशी यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंच्या विचारांना उजाळा दिला.

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम – श्रेयश मांडवकर, द्वितीय- अंकिता मोहिते, तृतीय – नयन कांबळे, सलोनी सावंत, उत्तेजनार्थ प्रविणा पेंढारी.

पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम केतन पानगले, द्वितीय- वैभवी गांगरकर, तृतीय-अभिषेक ताम्हणकर व साक्षी शिंदे विभागून व उत्तेजनार्थ प्रभात कांबळे व दिया कदम यांनी यश मिळवले.

वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे व प्रा. भूषण पाध्ये यांनी केले. पोस्टर स्पर्धेचे परीक्षण प्रा. अनिकेत जाधव व ग्रंथपाल मंजिरी कुलकर्णी यांनी केले. प्रा. सुदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनोद भुवड यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 18-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here