आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात युवक दिन साजरा

0

साखरपा : देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात युवक दिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांची जयंतीही साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात पाटील यांनी दोघांच्याही कार्याचा आढावा घेतला. त्यांचे विचार आजच्या काळातही कसे सुसंगत आहेत, हे त्यांनी यावेळी सांगितले. प्राध्यापक शिवराज कांबळे यांनी आपले विचार मांडले. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी योगिता कळंबटे आणि निकिता वेले या राज्य पोलिस दलात भरती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. संदीप मुळये, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. सीमा कोरे, प्रा. देवयानी जोशी, प्रा. धनंजय दळवी यांनी सहाय्य केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:42 PM 18-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here