‘अशक्याला शक्य’ बनवणाऱ्या नवलाई समूहाचं जिल्ह्याभरात कौतुक!

0

रत्नागिरी : व्यवसाय महत्वाचा आहेच, पण एखाद्याच्या डोक्यावरचं छप्पर शाबूत रहाणं अधिक महत्वाचं असा विचार जेव्हा एखादा व्यावसायिक करतो तेव्हा तो केवळ त्या गरजू व्यक्तीला समाधान नाही देत तर, आपल्या व्यवसायाची विश्वासार्हता, व्यवसायमूल्य असंख्य पटीने वाढवत असतो. याचं ताज उदाहरण म्हणजे रत्नागिरीतील प्रसिद्ध, नवलाई ग्रुप!
कमी तिथे आम्हीच, या तत्वावर काम करणाऱ्या नवलाई ग्रुपच्या सावंत बंधूंनी केलेली ही कामगिरी व्यावसायिकदृष्ट्या झळाळती तर आहेच पण ‘ग्राहक देवो भव’ हा विचार पुढे नेणारी.. गरजूंना मदतीचा भक्कम हात पुढे करणारी आहे. रत्नागिरीतलं वरवडे गाव वसलेलं डोंगरकुशीत, ग्रामीण भाग असल्याने इथं सोयीसुविधांचा अभाव अधिक! निसर्गाचा अजून एक प्रताप म्हणून इथल्या राजू जोशी यांच्या घरावर दरड कोसळली. मागची बाजू जमीनदोस्त! याचा बंदोबस्त करायचा तर चिऱ्याच बांधकाम उपयोगी नाही. प्लम काँक्रीटचा अद्ययावत पर्याय उपलब्ध आहे परंतु वरवडेसारख्या भागात ते उपलब्ध कसं करणार? एकतर हे ठिकाण शहरापासून ४० ते ५० किलोमीटर लांब! भर म्हणून पाण्याने भरलेले नदीचा अडथळा! काम व्हायचं तरी कसं? शेवटी जोशींचे कॉन्ट्रॅक्टर सचिन जोशी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव भरवशाचं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भरवसा ठेवणारं, २० वर्षं जुनं नाव सुचवलं.. नवलाई ग्रुप! अतिशय नेमकेपणाने आणि शिस्तबद्धरीत्या काम करणाऱ्या नवलाई ग्रुपने खडतर परिस्थितीतलं हे आव्हान स्वीकारलं आणि प्लम काँक्रीटची अवजड यंत्रणा वरवड्यासारख्या आडबाजूच्या गावात नेत, सगळे अडथळे पार करून काम पूर्ण करूनच निश्वास सोडला. काम कितीही अवघड असो, परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, ‘अशक्याला शक्य’ करण्याचं श्रेय नवलाई ग्रुपला जातं. ‘कितीही अडथळे आले तरी चालतील, कुणाच्या घराचं काम अडता नये, या भावनेनं आम्ही हे काम केलं’ हे सावंत बंधूंचे शब्द त्यांचं व्यवसायाबद्दल समर्पण दाखवतात. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातीलच एक अत्यंत विश्वासार्ह आणि नावलौकिक कमावलेला उद्योगसमूह म्हणून नवलाई ग्रुपचं सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here