अल्टो कारच्या धडकेत पादचारी ठार

0

पादचाऱ्यास धडक देत अपघात करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिद सत्तार सय्यद (वय ३८, रा. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री साजिद हे गयाळवाडी येथील हॉटेल रिसबूड येथे रस्ता ओलांडत असताना अल्टो कार चालकाने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साजिदला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here