नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी; भाजपा शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

0

मुंबई : काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात एफ. आय. आर दाखल करून घेण्यास सूचना द्यावी अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

बुधवार दि.१९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांची मंगळवारी राजभवन येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले असून मुंबई भाजपा यांचा तीव्र निषेध करत आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी देशातील जनतेच्या श्रध्दास्थानी आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेस समर्थकांच्या मानात एवढा द्वेष आहे की, देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हे पंजाब घटनेवरून सिध्द झाले असून ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष श्री. मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते श्री. प्रविण दरेकर, आमदार श्री. कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपा सरचिटणीस श्री. संजय उपाध्याय, मुंबई भाजपा उपाध्यक्ष श्री. आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. तेजिंदर सिंग तिवाना, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. शरद चिंतनकर, उत्तर पूर्व मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. अशोक राव, मुंबई भाजपा प्रवक्ता श्री. निरंजन शेट्टी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 19-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here