‘काँग्रेसने नाना पटोलेंची हकालपट्टी करावी’

0

नागपूर : पंतप्रधानांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

बावनकुळेंच्या नेतृत्त्वात मंगळवारी नागपुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपने कोराडी पोलिस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने केली.

नानावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी कोराडी पोलिस ठाण्यासमोर तीव भावना व्यक्त करीत आंदोलन केले. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही, असा आग्रह आ. बावनकुळे यांनी पोलिसांकडे व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी यावेळी नाना पटोले मुर्दाबाद, निषेधाच्या घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे कारस्थान-षडयंत्र करणार्यांना पटोले सहकार्य करीत असल्याचा हा प्रकार आहे. जमाव तयार करून मोदींच्या विरोधात जाणूनबुजून बोलणे आणि वातावरण दूषित करण्याचा पटोलेंचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

तसेच नाना पटोलेंकडून आलेल्या खुलाशावर बावनकुळे म्हणाले की, मोदी नावाच्या गावगुंडाबाबत मी बोलले असे नाना पटोले म्हणाले. साकोलीत असा एकही मोदी नावाचा गुंड नाही. अशा नावाचा गुंड असेल तर पटोलेंनी 3 दिवसात त्याला जनतेसमोर आणि माध्यमांसमोर उभे करावे असे आव्हानही. बावनकुळे यांनी दिले. नाना पटोले हे खोटे आहे. नानावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी आम्ही 7 मागण्यांचे निवेदन दिले आहे. या सातही मागण्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरच आम्ही येथून जावू. नाना पटोले यांची पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उंची नाही. काँग्रेसने त्यांची त्वरित अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:14 PM 19-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here