कुवारबाव येथे डोक्यावर दगड मारून तरुणाला केले जखमी

0

रत्नागिरी : अज्ञात कारणातून तरुणाच्या कानावर आणि डोक्यावर दगड मारुन त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा.कालावधीत कुवारबावस्टॉपजवळ घडली होती. प्रकाश हसमणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात अक्षय विष्णू घाडगे (२०, रा.कारवांचीवाडी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, अक्षयचा मित्र अभिषेक याच्यासोबत प्रकाश हसमणी याचा वाद आहे. तसेच अक्षयचा आणि प्रकाश हसमणीशी कोणताही संबंध नसताना अज्ञात कारणातून प्रकाशने अक्षयला दगड मारुन गंभीर जखमी केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here