जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

0

रत्नागिरी : वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. एकाच ठिकाणी राहून दहशत निर्माण करणाऱ्या शहरातील दोघांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ही कारवाई केली. हे दोघे म्हणजे इरफान उर्फ दाऊद अल्लाउद्दीन होडेकर (३०, रा.झारणीरोड) याच्यावर गांजासह गंभीर दुखापत आणि मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर झहिर मोहम्मद काझी (४१, रा.गवळीवाडा) याच्यावर देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठवड्यात रत्नागिरी शहरात दोन गंभीर घटना घडल्या होत्या. एका अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या केली होती. तर शहरात मोबाईल विक्रेत्यावर खंडणीसाठी गोळीबार केला होता. या हल्ल्यामध्ये मोबाईल व्यावसायिक गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here