गुन्हेगार सचिन जुमनाळकर याला नामोहरम करीत पोलिसांनी शहरातून फिरवले

0

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध मोबाईल व्यावसायिकावर खंडणीसाठी गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार सचिन भीमराव जुमनाळकर (४२, मूळ रा. बेलबाग, रत्नागिरी) याला शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) शहरातून तपासासाठी फिरवले. या गुन्हेगाराची व्यापाऱ्यांमध्ये असलेली भीती दूर व्हावी, पोलिस यंत्रणा आपल्याबरोबर आहे, असा विश्वास निर्माण होऊन निर्भयपणे व्यवसाय करावा, यासाठी पोलिसांनी गुन्हेगाराला शहरातून फिरवले. शहर पोलिस ठाणे ते बैलबाग करून गोखले नाक्यावरून काँग्रेस भुवनमार्गे फडके उद्यान येथील घटनास्थळी नेले. पोलिसांनी या गुन्हेगाराला नामोहरम करीत कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना कायद्याचा वचक राहावा, यासाठी या नामचिन गुंडाला शहरातून त्याला बुरखा घालून फिरवले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here