खेड शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत खोके

0

खेड : शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत खोके उभे राहिले असून नगर परिषदेकडून कोणतीही कारवाई होत नसून पालिकेचे अनधिकृत बांधकाम विषयक नेमके धोरण काय? असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

खेड नगर परिषदेने काही वर्षां पूर्वी शहरातील अवैध टपऱ्या, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आदींवर कारवाई केली होती. त्यांना हटवण्यात आले होते. मात्र, तो केवळ फार्स होता की काय असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

शहरात आता पुन्हा अवैध टपऱ्या, भाजी विक्रेते, फळ विक्रेते बसू लागले आहेत. यावर कहर म्हणून काहींनी थेट पक्की बांधकामे करून शहरातील रस्त्यालगतच्या मोकळ्या जागांवर दुकानांचे खोके उभारले आहेत. त्यामुळे शहराच्या विपतेमध्ये वाढ होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक मागील मार्केट गल्ली, दापोली रोड, तीनबत्ती नाका, भरणे- खेड रस्ता पंचायत समिती समोर आदींसह शहरातील डाकबंगला परिसर येथे रस्त्यालगत खोके उभारण्यात आले आहेत. एस.टी. स्थानक, बाजारपेठ आदी सर्वच ठिकाणी टप-या, भाजी विक्रेते, फळ विक्रेते रस्त्यावर, गटारावर बसलेले दिसून येत आहेत. या सर्वांना नगर परिषदेने अधिकृत तर नाही ना केले?, अतिक्रमण रोखण्यासाठी पालिकेकडून कार्यवाही होते की नाही? असे असंख्य सवाल नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनीच आता लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 20-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here