१९९५च्या माजी माजी विद्यार्थ्यांकडून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयास देणगी

0

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वर्ष १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांचा ‘जीजेसी ९५ फॅमिली-कॉलेज कट्टा’ हा ग्रुप एकत्र आला असून, या माजी विद्यार्थ्यांचे नुकतेच स्नेहसंमेलन महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झाले. याचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या या माजी विद्यार्थ्यांनी २५ हजार रुपयांची देणगी महाविद्यालयाला दिली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्याकडे ही देणगी सुपूर्द केली.

याप्रसंगी ‘जीजेसी ९५ फॅमिली-कॉलेज कट्टा’ ग्रुपचे बिपीन बंदरकर, सोनाली बंदरकर, पल्लवी मिरकर, लीना घाडीगावकर, श्रीकांत दुदगीकर, शेखर कवितके, प्रसन्न महाडिक, बिपीन शिवलकर, यतीन दामले, सत्यशील सावंत, कैलास चव्हाण, नंदकिशोर गोळपकर आणि उत्पल वाकडे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी देणगीबद्दल माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 21-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here