विद्यार्थ्यांकडून माखजन स्कूलला पुस्तकं भेट

0

माखजन : नूतन वर्षाचे स्वागत विविध पद्धतीने सर्वत्र केले जाते. पण माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेला पुस्तकं भेट देत नवीन वर्षाचे स्वागत केले. स्वतःच्या जमवलेल्या पैशातून विद्यार्थ्यांनी शाळेला पुस्तक भेट दिली. पुस्तकं भेट देताना, पुस्तकं ठेवण्यासाठी एक कपाट सजवण्यात आले होते.

येत्या महिन्याभरात ३०० पुस्तकांची स्वतंत्र लायब्ररी या शाळेत निर्माण करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here