आमचे सरकार 15 वर्षे टिकेल – खा. सुप्रिया सुळे

0

राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र विरोधकांकडून सतत सत्ताधारी पक्षांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच ठाकरे सरकार फार दिवस टिकणार नाही अशी भविष्यवाणी देखील करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘महाविकासआघाडीचे सरकार उत्तम प्रकारे काम करत असून हे सरकार 15 वर्षे टिकेल. मात्र, आमच्या सरकारबाबत माध्यमांद्वारे समज-गैरसमज पसरले जात आहेत. याबाबत आम्ही कोणतीही चिंता करत नाही,’ असा विश्वास सुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here