काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण खराब झालं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रहारच्या जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांना मारण्यात आलं. मात्र अजून त्यांच्या एकाही आरोपीला अटक झाली नाही. त्यामुळे समाजात फिरताना असुरक्षित वाटत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. कट्टरवादावाद विरोधात जो बोलतो त्याला सध्या टारगेट केलं जात आहे. तशा काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मी या सरकारकडे आणि गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी करत असल्याचं अमोल मिटकरीं यांनी सांगितलं आहे.
