जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराला कर्मचारी व जनता कंटाळली

0

वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली गंभीर दखल, येत्या काही दिवसातच निर्णयाची शक्यता

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सकांच्या कारभाराला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी पुरते कंटाळले असून अनेजण जिल्हा रुग्णालय सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराबाबत अनेकांनी रत्नागिरी खबरदारला देखील पत्र पाठवली आहेत. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, महिलांना सन्मान दिला जात नाही, जिल्हा रुग्णालयात बिल मंजूर करणारे एजंटांचे जाळे याबात अनेक तक्रारी या पत्रात नमूद केल्या आहेत. जनसामान्यांतून देखील संतप्त प्रतिक्रिया याबाबत उमटत असून याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. येत्या काही दिवसातच याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता असून या सर्व मनमानीत सहभागी असणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here