देशाच्या CDS च्या उप-प्रमुखपदाची मराठी महिलेवर जबाबदारी !

0

महिला अधिकाऱ्यांची स्थायी नेतृत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात यावी या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या काहीच दिवसानंतर एका मराठी महिलेला देशाच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या उप-प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माधुरी कानिटकर यांना लेफ्टनंट जनरल ही श्रेणी देण्यात आली आहे. या श्रेणीपर्यंत पोहोचलेल्या त्या देशातील तिसऱ्या महिला ठरल्या आहेत तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या उप-प्रमुख पदावर नियुक्ती झालेल्या पहिल्या अधिकारी आहेत. लष्कर, नौदल आणि हवाईदल या तिन्ही सैन्यदलात समन्वय साधला जावा आणि केंद्र सरकारला संरक्षणाबाबत योग्य सल्ला मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती केली. जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. माधुरी कानिटकर यांनी वैद्यकीय पदवीचं शिक्षण आर्म्ड मेडिकल फोर्सेस कॉलेज मधून घेतलं आहे. दिल्लीतील AIIMS मधून त्यांनी बालरोगशास्त्रात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं. त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. लष्करात विविध पदांवर त्यांनी 37 वर्षं काम केलं आहे. त्या AFMC च्या देशातील पहिल्या महिला डीन ठरल्या होत्या. त्यांचे पती राजीव नुकताच भारतीय सैन्यातून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले आहेत. या पदापर्यंत पोहोचलेलं कानिटकर दांपत्य देशातलं पहिलं दांपत्य ठरलं आहे. आपल्या नियुक्तीबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. “ही संस्था अत्यंत पारदर्शक, आदरणीय आणि महिलांसाठी सुरक्षित आहे. तिथे महिलांना योग्य संधी मिळते. रोजचं काम अगदी उत्साहाने करावं, कधीही हार मानू नये” असं त्या म्हणाल्या.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here