शरद पवारांच्या रुपात राष्ट्रवादीकडून एक नवतरुण चेहरा; भाजपचा टोला

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस ने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे, अशी बातमी येताच शरद पवारांवर आता टीकेची झोड उठून येताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटर च्या माध्यमातून पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पवारांच्या रूपाने पक्षाकडून एक नवतरुण चेहरा संसदेत जातोय, असा टोमणा मारून त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष युवकांचा आहे, असे भासवले जाते. त्याचबरोबर पवारांनी अनेक सभांमध्ये युवकांना पक्षामध्ये संधी मिळेल असा विश्वास देखिल दिला होता. परंतु पवारांनी राज्यसभेसाठी स्वतःच दावेदार असल्याचे जाहीर केल्यामुळे अशा प्रकारच्या टीका सध्या त्यांना सहन कराव्या लागण्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी प्रथमच राज्यसभेची निवडणूक एकत्र लढणार असल्याने पवार यांचा विजय सोपा मानला जात आहे. एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे या सातही जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.त्यामुळे पक्षाकडून मान्यवर चेहऱ्यांना संधी दिली जातेय.राष्ट्रवादी कडून शरद पवार,फौजिया खान, भाजपकडून रामदास आठवले आणि उदयन राजे यांचे नाव चर्चेत आहे.पण भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या या ट्वीट मुळे आगामी काळामध्ये अशा प्रकारचे ट्विटरयुद्ध चांगलेच रंगण्याची शक्यता आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here