व्यापाऱ्यांची ०४ मार्चला जाहीर सभा

0

रत्नागिरी: व्यावसायिक श्री. मनोहर ढेकणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने संपुर्ण जिल्हा व व्यावसायिक वर्ग हादरून गेला. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून व्यापारी बंधूनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. पोलीस प्रशासनाने अशा गुंडांपासून व्यापारींचे संरक्षण करण्यासाठी वेगळे पथक तैनात ठेवले पाहिजे. या सर्व बाबींचा विचार करता व्यापाऱ्यांनी बुधवार दि. ०४.०३.२०२० ला रोजी दुपारी ४ वाजता स्वयंवर मंगल कार्यालय मध्ये अत्यावश्यक जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी मान. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपअधीक्षक मा. इंगळे, श्री. सासणे व पोलीस निरीक्षक मा. लाड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सदर सभेला व्यापाऱ्यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे, असे महासंघाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here