बेजबाबदार मुख्य सचिवांना नाना पटोलेंनी दिला दणका

0

आज विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातील धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेला होता. तत्पूर्वी विधानसभा अधिवेशनाच्या सुरुवातीलाच अध्यक्ष नाना पटोले यांचा पारा चढला होता. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना कडक शब्दात तंबी दिली. मुख्य सचिवांनी विविध विषयांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न पाठविल्याने यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकले. यावेळी त्यांनी मेहतांना शिक्षा सुनावली. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी विधानसभेच्या गेटवर माफी मागावी अशी शिक्षा पटोलेंनी यावेळी सुनावली. गेटजवळ त्यांनी माफी मागावी व विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा करावं असं ते विधीमंडळात म्हणाले. गेल्या अधिवेशनात ८३ मुद्दे उपस्थित केले होते. त्यानंतर या विषयांचा पाठपुरावा केला जात होता. यासंदर्भात विविध प्रश्न तत्सम विभागाला विचारण्यात आले होते. मात्र याचं उत्तर न आल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकले आणि त्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतांना कडक शब्दात तंबी दिली. यानंतर मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर शिक्षेचा निर्णय मागे घेण्यात आला. आज विधीमंडळात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. यावेळी या समाजासाठी जे काही करण्याची गरज आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here