खेडमध्ये दुकानाला लागली आग

0

खेड : शहरातील बसस्थानकाच्या समोरील एलपी इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या स्टार हॉलिडेज या दुकानाला शनिवारी दि. २२ रोजी रात्री ८ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत या दुकानातील काही साहित्य जळून खाक झाले असून, पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने आग नियंत्रणात आणली आहे.

खेड शहरातील बसस्थानकासमोर एलपी इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत स्टार हॉलिडेज हे विनया चिखले यांचे दुकान आहे. शनिवारी दि २२ रोजी रात्री ८ च्या सुमारास त्या दुकान बंद करून गेल्यानंतर अचानक त्यांच्या दुकानातून धूर येऊ लागल्याने शेजारील व्यापाऱ्यांनी सौ.चिखले व पालिकेच्या अग्निशमन दलाला ही बाब कळवली.

शिवसेनेचे शहरप्रमुख निकेतन पाटणे, माजी उपनगराध्यक्ष कुंदन सातपुते, सतीश चिकणे यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलातील शाम देवळेकर, गजानन जाधव, पियुष माने व अन्य जवानांनी आग नियंत्रणात आणली. आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी गर्दी केली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 24-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here