जानेवारी 2020 पर्यंत सानियाचे टेनिसमध्ये पुनरागमन

0

नवी दिल्ली : आपल्या कारकिर्दीत खूप काही मिळवले असून, दुसर्‍या डावात काही सिद्ध करण्याची गरज नाही. आता फक्‍त खेळाचा आनंद घेण्यासाठी मैदानावर उतरणार आहे, असे भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा म्हणाली. जानेवारी 2020 पर्यंत सानिया पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. आई झाल्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळाच्या ब्रेकनंतर टेनिसमध्ये पुनरागमन करण्याची तयारी सानिया करीत असून, यासाठी ती रोज चार तास सराव करते आहे. तसेच, तिने 26 किलो वजनदेखील कमी केले आहे. आपल्या कारकिर्दीत दुहेरीत सहा ग्रँडस्लॅम किताब जिंकणारी सानिया मिर्झा ही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी देखील होती. याशिवाय स्वित्झर्लंडच्या मार्टिंना हिंगीससोबत तिने डब्ल्यूटीए सर्किटमध्ये अनेक किताब जिंकले. मी आपल्या कारकिर्दीत कधीच न विचार केलेल्या गोष्टी मिळवल्या. आता पुढच्या कारकिर्दीत जे घडेल ते माझ्यासाठी बोनस असेल. मला वाटले होते की, ऑगस्टमध्ये मी पुनरागमन करेन; पण आता जानेवारीपर्यंत मी कोर्टवर उतरेन, असे वाटत आहे. माझा मुलगा पुन्हा फिट होण्यासाठी माझी प्रेरणा आहे. मी पुनरागमन केले तरीही मला काही सिद्ध करायचे नाही. मला खेळणे आवडते. आता खेळाचा आनंद घेणे हेच पुनरागमन करण्याचे एकमात्र कारण असेल, असेही सानिया म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here