किरण तायडे यांचे २६ जानेवारीला उपोषण

0

खेड : मानवाधिकार असोसिएशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या निषेधार्थ लक्ष वेधण्यासाठी दि. २६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. खेड तालुक्यात देखील या योजनांतून करण्यात आलेली रस्त्यांची कामे असमाधानकारक व निकृष्ट असल्याचा आरोप मानवाधिकार असोसिएशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांनी केला आहे.

या कामावर देखरेख ठेवणारे अधिकारी यांच्या विरोधात व बेजबाबदार ठेकेदार यांच्या विरोधात दि. २६ रोजी खेड तहसील कार्यालयासमोर ते लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे श्री. तायडे यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:43 PM 24-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here