आ. नितेश राणेंचे स्वीय सहायक राकेश परब यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी येथील प्रमुख जिल्हा न्यायालयाने आ. नितेश राणे यांचे स्वीय सहायक राकेश परब यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळला.

दरम्यान, याच प्रकरणातील अजून एक संशयित आरोपी करण कांबळे याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानेही आपल्याला जामीन मिळावा, यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

कटकारस्थान करून संतोष परब यांना जीवे मारण्याचा आ.राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. यात कणकवली पोलिसांनी एकूण सहा संशयित आरोपींना अटक केली होती व सुनावनी दरम्यान दोन संशयित फरारी होते. तर आणखीही काही संशयितांचा सहभाग असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हंदळेकर हे या प्रकरणी काम पाहत आहेत.

संतोष परब याच्या सांगण्यानुसार पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी १८ डिसें. २०२१ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. यात प्रथम ४ नंतर १ व २५ डिसेंबर रोजी एक अशा एकूण सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सहा नंबरचा संशयित सचिन सातपुते याला नवी दिल्ली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. २६ डिसेंबर रोजी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली होती. त्याच्या जबाबानुसार हे कटकारस्थान झाल्याचे व जिल्हा बँकेचे शिवसेना गटाच्या पॅनेलचे प्रचार प्रमुख असणाऱ्या संतोष परब यांना गाडीने ठोकर देऊन फटकावण्याचे व धमकी देण्याचे हे कटकारस्थान होते, असे पोलिसांच्या माहितीनुसार सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयासमोर सांगण्यात आले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी म्हणजे २८ ऑगस्ट २०२१ रोजी जनआशीर्वाद यात्रेत ओरोस फाट्यावर दाखल झालेल्या व्हॅनीटी व्हॅनमध्ये हे कट शिजल्याचे सरकारी वकीलांनी म्हणणे मांडले होते. तसेच या गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा व स्विफ्ट कार, हल्ल्यासाठी वापरलेला चाकू, नंबर प्लेट बदलण्यासाठी वापरलेला स्क्रू ड्रायव्हर, ६ संशयितांनी वापरलेले मोबाईल हँडसेट आदी पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

या प्रकरणात राकेश परब यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून त्यांनी आपल्याला या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणीच्या वेळी राकेश परब आणि सातपुते यांचे या कालावधीत
त्यांचेही लोकेशन मिळालेले आहे. त्यामुळे संशयित आरोपींशी झालेले त्यांचे संभाषण प्रत्यक्ष तपासणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांचा मोबाईलही हस्तगत करणे आवश्यक असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, असा युक्तिवाद सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आला होता. यानुसार राकेश परब यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 25-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here