देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट

0

नवी दिल्ली : वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती.

मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पण दुसरीकडे कोरोना मृतांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 2,55,874 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनामुळे देशभरात आता 4,90,462 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 22,36,842 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:59 AM 25-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here