रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरणाऱ्यास पोलिसांनी घातले वेसण

0

रत्नागिरी: रेल्वे स्टेशनला विश्रांती घेणाऱ्या तरुणाचा मोबाईल लांबविणारा तरुण सीसीटीव्हीत कैद झाला. संशयित चोरट्याला शहर पोलिसांनी तत्काळ अटक केली. नागेश बन्सी टिगरे (रा. परळी वैजनाथ) असे संशयिताचे नाव आहे. तर मनोज मोरे (रा. धामणसे) हे मध्यरात्री रेल्वे स्टेशनला उतरले असता धामणसे येथे जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे तो रेल्वेस्टेशन मध्येच झोपला. मोबाईल बाजूला ठेवला होता. झोप लागली असताना संशयित तरुणाने त्याचा मोबाईल लांबविला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे तात्काळ शहर पोलिसांनी चोरट्याला अटक केली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here