चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंचे काम पाहून मग टीका करावी – आ. रोहित पवार

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना अनुभव नसतानाही मंत्रीपद मिळाले, अशी टीका केली होती. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला रोहित पवार यांनी पुढे सरसावत प्रत्युत्तर दिले. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचे काम बघावे. तुमच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाले होते. याच अनुभवातून तुम्ही बोलत आहात का?, असा खोचक सवाल रोहित पवार यांनी पाटील यांना विचारला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here