तुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला

0

तुर्कीने सीरियावर ड्रोन हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये 19 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तुर्कीने रविवारी सीरियाचे दोन फायटर जेट पाडले. यामुळे आता रशिया आणि तुर्कीमधील तणाव आणखी वाढला आहे. उत्तर-पश्चिम सीरियातील इदलिब प्रांतात अनेक आठवडे सुरू असलेल्या हिंसाचारानंतर गेल्या आठवड्यात सीरिया हवाई हल्ल्यात अनेक तुर्की सैनिक मारले गेले. त्यानंतर तुर्कीने रशिया समर्थक सीरिया सेनेविरोधात एक लष्करी मोहिम सुरू केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here