उत्तर कोरियात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने किम जोंगनी दिले गोळ्या घालण्याचे आदेश

0

कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला असून 83 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा किरकोळ बाबींसाठी क्रूर शिक्षा सुनावण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. दरम्यान, किम जोंग उनच्या क्रौर्याची अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर उपचार करण्याऐवजी किम जोंग यांनी त्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, किम जोंग यांनी कोरोना रुग्णाला गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरस हा उत्तर कोरियामध्ये पसरू नये यासाठी त्याला थेट गोळ्या घाला असा आदेश किम जोंग यांनी दिला आहे. उत्तर कोरियातील एक व्यक्ती कामानिमित्त चीनमध्ये गेली होती. त्यावेळी तिथे त्याला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती चीनमध्ये परतली आहे. या व्यक्तीमुळे इतर लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसने आता जगालाच आपल्या कवेत घेण्यास प्रारंभ केल्याने जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीने आशियातील सर्वच शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण झाली. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला आहे. शेअर बाजार घसरल्यामुळे गेल्या काही दिवसांत जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि एसव्हीएमएचचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना तोटा झाला आहे. शेअर मार्केट डाऊ जोन्सचा औद्योगिक सरासरी निर्देशांक 12 टक्क्यांनी घसरला आहे. 2008 आर्थिक संकटानंतर अशी स्थिती पहिल्यांदाच दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. किम जोंगने काही दिवसांपूर्वी एका जनरलला नरभक्षक पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकून मृत्युदंड दिला होता. पिरान्हा मासे हे दक्षिण अमेरिकेत आढळतात. या माशांचे कळप त्यांच्या तीक्ष्ण दातांमुळे माणसालासुद्धा फाडून खाते. उत्तर कोरियाने हे मासे ब्राझीलमधून आयात केले होते. या माशांनी भरलेल्या टँकमध्ये फेकून या जनरला मृत्युदंड देण्यात आला. मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या जनरलवर सत्तापालट करण्याचा कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स बॉण्डच्या यू ओन्ली लिव्ह ट्वायसमधील घटनेचा आधार घेत या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here