तरुणांनी मतदानाचे महत्त्व ओळखून मतदानाचा हक्क बजावावा : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0

सिंधुदुर्ग : तरुणांनी मतदानाचे महत्त्व लक्षात घेत त्यानुसार अंमलबजावणी केली पाहिजे. मतदानाचा हक्क बजावून चांगले सरकार स्थापन करण्यामध्ये हातभार लावला पाहिजे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कुडाळ येथील राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमप्रसंगी बोलताना केले.

HTML tutorial

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, तसेच निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन हा कार्यक्रम संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे मंगळवारी घेण्यात आला.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन झाडाला पाणी घालून करण्यात आले. त्यानंतर, व्हिडिओ मेसेज दारे निवडणूक आयोगाद्वारे मतदान हक्कांबद्दल माहिती देण्यात आली. आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बसवायचा आहे, त्याची शपथ सर्वांना देण्यात आली.

विभागीय निवडणूक अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी मतदान करण्यासंदर्भात तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच मतदान करणे हा एक हक्क आहे असे संगितले. त्यानंतर प्राध्यापकांनी मागील वर्षांमध्ये विशेष कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये तीन पीएचडी धारक प्राध्यापक, एक प्रोफेसर पद मिळालेले प्राध्यापक आणि एनसीसी सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड झालेले प्राध्यापक यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी उपस्थित होत्या. त्यांनी तरुणांनी मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी केली पाहिजे व मतदानाचा हक्क बजावून एक चांगलं सरकार स्थापन करण्यामध्ये हातभार लावला पाहिजे असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यक्रम निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देसाई यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. आवटे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 26-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here