प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चांदेराईत इब्राहिम पट्टण सायकल स्पर्धा

0

रत्नागिरी : आज दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चांदेराईचे माजी उपसरपंच प्रसिद्ध आंबा व्यापारी उस्मान काझी व प्रसिद्ध आंबा बागायतदार व्यापारी आरकम अल्ताफ खान यांनी प्रयोजित व आयोजित केलेली इब्राहिम पट्टण सायकल स्पर्धा २०२२ सकाळी १० वाजता संपन्न झाली. दोन गटात ही स्पर्धा झाली.

लहान गटात वयोगट : ९ ते १३ मध्ये १) प्रथम क्रमांक कु. पार्थ संयोग दळी , २) द्वितीय क्रमांक स्वानंद समीर दळी , तर ३) तृतीय क्रमांक अर्चित अभय दळी.
मोठा गट वयोगट : १३ ते १८ मध्ये १) प्रथम क्रमांक महमद अली उमर काझी..२) द्वितीय क्रमांक यश तुषार मलुष्ट्ये.. ३) तृतीय क्रमांक श्रेयश संतोष सुर्वे यांनी यश संपादन केले. सर्व विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अल्ताफशेठ खान, अयुब काझी, खुदबू काझी, दादा दळी, दर्शन दळी, अण्णा गांगण , अब्दुल्ला काझी, आरकम खान, तब्रेझ काझी, अखिल मुकरी, शेख काझी खान बंदरी सर्व युवक कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:14 PM 26-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here