उपेक्षित परिचारिकांच्या प्रश्नात समविचारी मंच लक्ष घालणार

0

रत्नागिरी : आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या परिचारिकांना उपेक्षा सहन करावी लागते. एकाच पदावर काम, पदोन्नती नाही, कामाच्या तासांची निश्चिती नाही, खासगी रुग्णालयात किमान वेतनाचा अभाव, अशा समस्यांना परिचारिकांना सामोरे जावे लागत आहे.

या प्रश्नी महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा कामगार संघटना लक्ष घालणार आहे, असे समविचारी मंचाने जाहीर केले आहे.

याबाबत राज्य अध्यक्ष बाबा ढोल्ये, महासचिव श्रीकांत दळवी, सरचिटणीस संजय पुनसकर, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, रणजित गद्रे, युवाध्यक्ष नीलेश आखाडे, सहचिटणीस मनोहर गुरव, परिचारिका संघटना प्रमुख सौ. प्रतिज्ञा ढोल्ये सौ. अंजली वाघाटे यांनी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ग्रामीण भागात परिचारिकांना काम करणे अवघड होत चालले आहे. ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांकडून परिचारिकांना अवमानास्पद वागणूक दिली जाते. अनेक वेळा ग्रामीण उपकेंद्रात वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसल्यावर सेवेची सर्व जबाबदारी परिचारिकांवर असते. आरोग्य यंत्रणेच्या माता बाल संगोपन, कुटुंबकल्याण, अंधत्व निवारण, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु योजना, क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निर्मूलन अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांची कामे परिचारिकांना करावी लागतात. लसीकरण, किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देणे, मातांच्या बैठका घेणे, गर्भवती महिलांना प्रसूती होईपर्यंत व नंतर सेवा देण्याचे काम परिचारिका करीत असतात. राज्यात परिचारिकांची असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे पाच ते सात हजार लोकसंख्येमागे एका परिचारिकेला काम करावे लागत आहे. एका परिचारिकेकडे चार ते पाच गावे दिली जातात. त्यामुळे एका गावाहून दुसरे गाव असे करीत काम करत असताना परिचारिकांना कसरत करावी लागत आहे. तीन हजार लोकसंख्येमागे एक परिचारिका तसेच एक किंवा दोन गावे देण्याची समविचारी परिचारिका संघटनेची मागणी आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या परिचारिकांना पदोन्नतीची व्यवस्था असली पाहिजे. परंतु एकाच पदावर सेवानिवृत्त होण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यांना पदोन्नतीची वेतन श्रेणी दिली जाते. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. परिचारिकांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची वेळ येते. सुट्टीच्या दिवशीदेखील त्याला काम करावे लागते. त्यामुळे आठ तासांची ड्युटी असावी, अशी शासन सेवेत असणाऱ्या परिचारिकांची मागणी आहे. ही मागणी महाराष्ट्र समविचारी सर्वसेवा परिचारिका संघटनेने आरोग्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहेय

जीवनमानाशी निगडीत असलेल्या आरोग्य या अत्यावश्यक सेवेत कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येऊ नयेत, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने करण्याची तयारी समविचारी कामगार संघटनेने केली असल्याचे या विभागाच्या प्रमुख सौ.ढोल्ये यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:39 PM 26-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here