केरळ, बंगळूरुप्रमाणेच रत्नागिरीत मत्स्यबीज केंद्र सुरू करणार : पालकमंत्री ॲड. अनिल परब

0

रत्नागिरी : शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्हा सुजलाम-सुफलाम करु या. पर्यटन विकासातून जिल्हा जगाच्या नकाशावर आणायचा आहे. कोकणात मत्स्य व्यवसाय मोठा आहे
केरळ, बंगळूरुप्रमाणे रत्नागिरीत मत्स्यबीज केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रजासत्ताकदिनी केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोविड-19 च्या महामारीच्या काळात ज्यांनी समाजाचे आरोग्य राखण्यासाठी अपार मेहनत केली अशा सर्वांचा या प्रसंगी आवर्जून उल्लेख करतो असे सांगून पालकमंत्री म्हणाले, कोविड 19 च्या संकटातून आता आपण बाहेर पडण्याच्या मार्गावर आहोत. पंरतु अजून कोराना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे सर्वांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन करा. याआधी सांगितल्याप्रमाणे वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शासनाकडून कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी आता लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोस अजूनही घेतला नसेल त्यांनी तो घ्‍यावा, असे आवाहन पालकमंत्री ॲड. परब यांनी यावेळी केले.

ते म्हणाले कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य योजना शासनाने आणली असून जिल्ह्यातील अंदाजे 866 पेक्षा जास्त जणांना त्याचा लाभ मिळाला आहे. ज्यांनी या योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज केला नसेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. कोरोना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहेत. 15 व्या वित्त आयोगातील अबाधित निधीच्या 25 टक्के निधीला अधीन राहून कोविड विषयक बाबींसाठी खर्च करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चालू वर्षाच्या मंजूर 250 कोटींच्या 30 टक्के निधी राखून ठेवण्यात आला असून यामधून कोविड‍ विषयक कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क असून कोरोनाच्या संकटाशी शासन खंबीरपणे लढत असून यामध्ये महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद आदि विभाग उत्तम काम करीत आहेत.

भविष्यात जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आरोगय विभाग व प्रशासन करीत आहे. कोविड, नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, तौक्ते व अलिकडील अतिवृष्टी या सर्व संकटांच्या मालिकेत प्रत्येकवेळी शासन आपल्या पाठीशी उभे राहिले आहे. निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना नुकसान भरपाई देताना सर्व निकष बदलून शासनाने मदत केली. यावर्षी झालेल्या चिपळूण, खेड येथील पूरबाधितांनाही शासनाकडून मदत करण्यात आली. आपत्तीदरम्यान व नंतरच्या काळात मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे आल्या व तातडीची मदत तसेच जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले त्याबाबत परब यांनी आभार व्यक्त केले.

विकासाचा दृष्टिकोण ठेवत जिल्ह्यात असणाऱ्या सुंदर अशा सागरी किनाऱ्यांचा विकास करुन स्थानिकाना रोजगार आणि पर्यटनाला चालना असे नियोजन शासनाने केले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत जिहयामध्ये मॅग्रोव्हज् पार्क व कांदळवन सफारी करिता House Boat त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता समुद्रकिना-यावर साहसी जलक्रिडा प्रकार, जिल्ह्याचे पर्यटन संकेतस्थळ इ. उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 27-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here