नामजोशी क.महाविद्यालयातील मुलांनी प्रजासत्ताक दिनी सादर केलेल्या संस्कृत गीताचे कौतुक

0

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या adv. पी आर नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील व माखजन इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संस्कृत भाषीय सामूहिक गीताने वाहवा मिळवली. प्रजासत्ताक दिली विद्यार्थ्यांनी समूह गीत सादर केले.

मूळ हिंदी भाषेत असणाऱ्या ‘ये मेरे वतन के लोगो’ गीताचे त्याच चालीवर श्री यज्ञप्रकाश वाजपेयी यांनी संस्कृत भाषेत अनुवादन केले आहे. हे गीत विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या सादरीकरणार प्राजक्ता भुवड, प्राची किंजळकर, शिल्पा भुवड, रोशनी भायजे, रसिका गुरव, तेजश्री गुरव, वृषाली भुवड, तेजस पकडे, अनिकेत भुवड, ऋतेश भुवड, विपुल सागवेकर, यश पवार, कुळ्ये, रोशनी काळंबी, शिवम तटकरे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांना सचिन साठे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आनंदजी साठे यांचे हस्ते झेंडा फडकवण्यात आला. यावेळी संचालक ओंकार पाटणकर, मुख्याध्यापक मनोजकुमार नार्वेकर, पर्यवेक्षक गणेश शिंदे, इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत उपस्थित होत्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 27-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here