रत्नागिरी: महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दिले जाणारे वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या शेवटी थकबाकीच्या रकमेत होणारी वाढ महावितणच्या एकूण आर्थिक परिस्थितीला मारक ठरेल. त्यामुळे दरमहाच्या वसुलीचे लक्ष्य त्याच महिन्यात शंभर टक्के पूर्ण करण्यासोबतच थकबाकीदारांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करा, असे स्पष्ट निर्देश कोकण विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
