देवरुख: अतिक्रमणाबाबत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे : मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे

0

देवरुख : अतिक्रमणा बाबतीत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, नगरपंचायत प्रशासनही व्यापाऱ्यांना सहकार्य करेल, यापुढे कारवाई सुरुच राहिल मात्र व्यापाऱ्यांनी सहकार्य केल्यास कारवाई करण्याची वेळच येणार नाही अशी भूमिका मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी मांडली.

IMG-20220514-WA0009

यावर सर्व व्यापारी नगरपंचायतीला सहकार्य करतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

मागील बुधवारी शहरात झालेल्या अतिक्रमण विरोधी कारवाई नंतर व्यापारी आणि प्रशासन यांची भूमिका समजून घेण्यासाठी मंगळवारी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष दालनात झालेल्या या बैठकीला नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सान्वी संसारे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह नगरसेवक आणि व्यापारी उपस्थित होते.

व्यापारी संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी यावेळी सर्वांतर्फे बाजु मांडली. तर यावेळी झालेल्या चर्चेत हानिफ हरचिरकर, बाळु ढवळे, प्रफुल्ल भुवड, अभिजीत शेट्ये, सुशांत मुळ्ये, मंदार गानू, आबा भालेकर, योगेश जागुष्टे यांनी सहभाग घेतला.

प्रशासनाची भूमिका सांगताना मुख्याधिकारी यांनी, रस्त्यावरील अतिक्रमणाने वाहतूक कोंडी होते त्यामुळे ती हटवणे गरजेचे होतेच शिवाय गटारावर विनाकारण लावण्यात आलेला मालही बाजुला करणे गरजेचे होते यासाठीच हि कारवाई करण्यात आल्याचे सांगत यापुढेही हि कारवाई अधे मधे सुरूच राहणार आहे. मुळात व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास कारवाईचा प्रश्नच येत नाही असे सांगत आपलेच गाव आपणच सुधारुया असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाबा सावंत यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी सांगितल्या तसेच कारवाईच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही सर्वानी बैठक घेऊन प्रशासनाला सहकार्य करू असे ठरविले असल्याचे स्पष्ट केले.

जिथे गटारे नाहीत तिथे मालासाठी हद्द आखून द्यावी, बस स्थानकासमोरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे, याच ठिकाणी मोठी वाहने उभी करण्यासाठी जाग मिळावी, शहरात पार्किंगची व्यवस्था व्हावी, अपना बाजार समोरच्या रिक्षा स्टॅंडची दिशा बदलावी, जिर्ण झालेल्या आणि शहरातील सर्वात पहिल्या असलेल्या प्रतिज्ञा इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजवावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावर योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्याधिकारी यांनी दिली.

यावेळी व्यापारी आणि प्रशासनात खेळीमेळीत चर्चा झाली त्यामुळे आगामी काळात देवरुख मधील अतिक्रमण प्रश्न निश्चितच कमी होइल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शहरात कुठेही पार्किंगची जागा उपलब्ध नाही. या जागेसाठी नगरपंचायतीने पाहणी केली असून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आला आहे. जिल्हाधिकारीआणि पोलिस विभाग यांच्या मान्यते नंतर या जागेवर कार्यवाही होइल आणि देवरुखमधे हक्काची पार्किंग व्यवस्था निर्माण होइल असे यावेळी सांगण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 27-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here