लांजा पंचायत समितीच्या बांधकामाची तज्ज्ञांकडून पाहणी

0

लांजा : लांजा पंचायत समितीच्या नूतन इमारत बांधकामाला रायगड लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे शासन नियुक्त तंत्रज्ञ आणि आर. सी. सी. डिझाईनर तज्ज्ञ डॉ. सचिन पोरे यांनी नुकतीच भेट देऊन कामाची पाहणी केली.

लांजा पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे बांधकाम हे बोगस आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनंत जाधव यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. सचिन पोरे यांनी शुक्रवारी सायंकाळी लांजा येथे पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाला भेट दिली.

या वेळी त्यांनी कामाची पाहणी केली आणि हे काम हे योग्य पद्धतीने नियोजित आराखड्यानुसार सुरू असून उत्कृष्ट असल्याचा निर्वाळा दिला.

या प्रसंगी डॉ. सचिन पोरे यांच्यासह लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, जि. प. चे कार्यकारी अभियंता आर. बी. मठपती, लांजा उपविभागाचे शाखा अभियंता हेमंत शिवपुरे, आर. सी. सी. डिझायनर मंदार आंबेकर यांच्यासह ठेकेदार गणी हसन मुलाणी आणि असिम मुलाणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here