रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सुमारे आठ हजार एकर जमिनीची संमत्तीपत्रे घेवून थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत भेटण्यासाठी जोरदार प्रयत्नात असलेल्या समर्थकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस धावुन आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी समर्थकांची भेट घडवून आणणार म्हणजे आणणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये व रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी व्यक्त केला.
