आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर होण्याची शक्यता

0

सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे आज जिल्हा न्यायालयासमोर हजर होण्याची शक्यता आहे. आमदार राणे ओम गणेश बंगल्यावरून बाहेर पडले आहेत.

जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवीही सकाळीच त्यांच्या बंगल्यावर आले होते. सकाळपासून ओम गणेश बंगल्यावरील वेगवान हालचाली सुरु होत्या. त्यानंतर ते बाहेर पडले.

दरम्यान काल, गुरुवारीच रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीत दाखल झाले आहेत. नारायण राणे कणकवली येथील आपल्या ओम गणेश बंगल्यावर तळ ठोकून आहेत. त्यानंतर आमदार नितेश राणे नेमकी काय भूमिका घेतात आणि स्वतःला अटक करून घेतात का ? यावर तर्क वितर्क लढवले जात होते.

सिंधुदुर्गातील शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं काल झालेल्या सुनावणीत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आणि येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचा आदेश दिला.

नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही आमदार राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:37 PM 28-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here