मुंबई विद्यापीठचे सिंधुदुर्गात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्याने सुरू झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील उप-परिसरात आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेश प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे व १५ फेब्रुवारी पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

मत्स्यशेती – Aquaculture व औद्योगिक सुरक्षा आणि व्यवस्थापन – Industrial safety and Management असे दोन अभ्यासक्रम सिंधुदुर्ग उपपरिसरात सुरू करण्यात आलेले आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सावंतवाडी येथील विद्यापीठाच्या उप-परिसराचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग यांनी केले आहे.

मत्स्यशेती (मत्स्यपालन) हा ६ महिन्यांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून यामध्ये गोड्या व खाऱ्या पाण्यातील माशांची नियंत्रित लागवड (शेती) व शोभिवंत माश्यांची पैदास यांचा अभ्यास व प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठाने खास कोकणासाठी तयार केला आहे तर औद्योगिक सुरक्षा आणि व्यवस्थापन हा १ वर्षांचा अर्धवेळ अभ्यासक्रम आहे.औद्योगिक सुरक्षा आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी तज्ञ व्यक्तिंचा सहभाग असणार आहे. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेचं महत्व असल्याकारणानेच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे सध्या कोकणात काही ठिकाणी एमआयडीसी असून नवीन चालू होणार आहेत त्याच्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

त्याचबरोबर या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणि मुंबई विद्यापीठासाठी एक मदत कक्ष सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग उप-परिसरामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. या मदत कक्षाच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांची माहिती तसेच मुंबई विद्यापीठ संदर्भात अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मदत केली जाणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी 0२३६३- २७५८६७ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिंधुदुर्ग उप-परिसरामार्फत करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:11 PM 28-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here