फाशी पुन्हा लांबणीवर!

0

दिल्लीसह देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप प्रकरणात 4 गुन्हेगारांना उद्या म्हणजे 3 मार्चला फाशी देण्यात येणार होती. पण अखेरच्या क्षणी कोर्टाने या चौघांची फाशी थांबवण्याचे आदेश दिले. पटियाला न्यायालयाने पुढच्या आदेशापर्यंत निर्भयाच्या दोषींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. पुढचे आदेश मिळत नाहीत तोवर आता ही फाशी होणार नाही. आतापर्यंत या चार गुन्हेगारांविरोधात तीन वेळा डेथ वॉरंट जारी करण्यात आलं होतं. तिन्ही वेळा फाशी पुढे ढकलण्यात आली. दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज सकाळीच सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. बंद कॅमेरात पवनच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी झाली. पण आता दुसऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू असाना पतियाळा कोर्टाने फाशी तूर्त स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here