सिंधुदुर्गात सोमवारपासून शाळा सुरु होणार

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा ३१ जानेवारीपासून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी शुक्रवारी ओरोस येथे दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील १ ली ते १२ वीचे वर्ग ३१ जानेवारी २०२२ पासून पुन्हा एकदा चालू होणार आहेत.

सुरक्षिततेची पुर्ण काळजी घेऊन तसेच कोविडचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात याव्यात. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियमित शाळेच्या वेळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून कामकाज करावे असे या आदेशात स्पष्ट केले आहे. राज्यात ओमिक्रोनच्या रूपात कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर ६ जानेवारी २०२२ पासून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वी शिक्षण विभाग कडून देण्यात आले होते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने विविध संघटना तसेच माध्यमातून शाळा चालू करण्याबाबत मागणी झाल्यानंतर राज्य शासनाने २४ जानेवारीपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. ही परवानगी देताना स्थानिक पातळीवरती कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता निर्णय घ्यावेत असे स्पष्ट केले होते. दरम्यान शुक्रवारी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी याबाबत आदेश काढले असून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा मधील १ ली ते १२ वीचे वर्ग दिनांक ३१ जानेवारीपासून चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:34 AM 29-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here