महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 03 मार्च ते 23 मार्चपर्यंत होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. 9045 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश असणार आहे. कॉपी आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
