आर.डी.सी.सी. बँकेमध्ये E-Commerce सुविधा कार्यान्वित

0

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहकांसाठी ए.टी.एम. E-Commerce सुविधा कार्यान्वित केली असून, सदर सुविधेद्वारे बँकेच्या ए.टी.एम. कार्डधारकांना सर्व प्रकारची तिकिट बुकींग, मोबाईल फोन रिचार्ज, ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन लाईटबील पेमेंट इ. चा लाभ घेणे शक्य होणार आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने मागील १० वर्षांमध्ये आर्थिक प्रगती करत असताना, ग्राहकांना आधुनिक सर्व सेवा सुविधा देण्यावरही भर दिला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावरील जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आली आहे. बँकेला मागील वर्षी महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाला असून बँकिंग फ्रंटीयर्स व बँको या राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थांमार्फत देखील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत आरटीजीएस, नइएफटी, सीटीएस, एसएमएस अलर्ट, पॉस ट्रान्ॉक्शन, DBT (Direct Benefit Transfer ), PFMS (Public financial Management system), FLC(Financial Literacy center), लॉकर्स इ. सारख्या अनेक आधुनिक सेवा सुविधा बँकेच्या ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भविष्यामध्ये मोबाईल बँकिंग व नेटबँकिंग यासारख्या आधुनिक सुविधा लवकरच सुरु करण्याचा बँकेचा मानस आहे. बँकेमार्फत मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन ग्राहकांना करणेत आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here