मंडणगड तालुक्यातील लाटवण पिंपळगाव गावाचे सुपुत्र सैनिक मुकेश नारायण कदम (वय ३७) यांचे झोपेत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते गेले १६ वर्षे भारतीय सैन्यदलाच्या सेवेत कार्यरत होते. कदम यांच्या लष्करी सेवेची सुरुवात जम्मू येथील पोस्टिंगने झाली होती. सध्या ते दिल्ली मुख्यालयातील ॲटलरी विभागात हवालदार या पदावर कार्यरत होते. आज ३ मार्च रोजी पिंपळगावात सकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
