गावखडी/वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभीस महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष कडवईकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षकवृंदांनी अभिवादन केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष कडवईकर, पदवीधर शिक्षिका स्नेहल कांबळे, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, अनिता जाधव, शंकर वरक आदींची उपस्थिती लाभली.
त्यानंतर 30 जानेवारी हा हुतात्मा दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने व्हिडीओ स्वरूपात भाषणे आयोजित करण्यात आली होती. स्नेहल कांबळे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 31-Jan-22
