”मीही मोदींचा आदर्श ठेऊन सोशल मीडियाचा त्याग करणार” – अमृता फडणवीस

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया त्यागाच्या ट्‌वीटनंतर देशभरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियाला रामराम ठोकण्याच्या निर्णयाची आपल्या आयुष्यात पुनरावृत्ती करण्याची तयारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे. सोशल मीडियावर सतत ऍक्‍टिव्ह राहणाऱ्या अमृता फडणवीस यांनी ट्‌वीट करुन सोशल मीडिया सोडण्याचा आपण निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. नरेंद्र मोदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेणार असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here